Thursday, June 23, 2011

!! तुला खूप मोठं व्हायचं आहे !!

सखी नुकताच दहावीचा रिझल्ट लागला
आणि त्यांत नेहमीप्रमाणे मुलींनीच बाझी मारली
कठीण परिस्तिथीत, गरिबीशी झगडत, मेहनतीने
प्रामाणिकपणे शेवटी मुलगीच अग्रेसर ठरली

मी ही अभिनंदन करण्यासाठी माझ्या मित्राच्या साडूच्या घरी
तिच्या मुलीला साक्षीला अभिनंदन करण्यास गेलो
पण ती मात्र वडिलांच्या फोटोजवळ अश्रू ढाळत होती
कारण काही महिन्यापूर्वीच तिच्या बाबांना देवाज्ञा झाली होती

वडिलांच्या फोटोला कवटाळत ती " बाबा !! बाबा "
म्हणत केविलवाणी हाक मारत होती
कारण ही तसंच होतं वडिलांच्या अपेक्षा
तिने अहोरात्र अभ्यास करून पूर्ण करून दाखवली होती

ती दहावीत असताना बाबांनी खूप कष्टाने तिले हवे ते दिले होते
तिच्या क्लासच्या पैश्यासाठी स्वतःची बाईक सुद्धा विकली होती
तिच्या बारीक सारीक गोष्टींची खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली होती
तिला त्रास होवू नये म्हणून सगळी खबरदारी बाबांनी घेतली होती

अचानक बाबांना ऑफिसमध्येच हृदयाचा झटका आला आणि ते देवाघरी गेले
परीक्ष्या तोंडावर आली असता तिचे पितृछत्र हरवून भयानक दुःख नशिबी आले
एकीकडे घरांत दुःखाचे सावट आई लहान भावाचे अश्रू पुसावे की स्वतःला सावरावे
तिला काहीच कळत नव्हते की बाबांना दिलेले वचन मन घट्ट करून पूर्ण करावे

बाबांनी तिला एकदा जवळ घेत कुरवाळत सांगितले होते की
": साक्षी जास्त नको पण ९०% तरी मार्क मिळव बास !! "
त्यांचा शब्द न शब्द तिच्या कानांत सारखा घुमत होता
अन अभ्यास करत असता पाना पानांत तिचा अश्रू सांडला होता

अभ्यास करता त्यांच्या आठवणीत तिचे पुस्तक अश्रुनी भिजून जात होते
पण बाबांचे स्वप्नही तिला जिद्दीने पूर्ण करायचे होते
बाबांचा फोटो जवळ घेवून ती अभ्यास करायची
जणू तिच्या बाबांची सावली तिच्यासवे नेहमी असायची

तिला बाबांचा तो शब्द नेहमी आठवायचा
" साक्षी !! तुला खूप मोठं व्हायचं आहे
आम्ही जे आयुष्यात नाही केलं ते तु
प्लीज माझासाठी तरी करून दाखवायचं आहे !!!""

दहावीला तिला ९६% मार्क्स मिळाले आणि रिझल्ट हाती येताच
तिने बाबांच्या फोटो जवळ तो ठेवत मोठ मोठ्याने रडू लागली
आईला घट्ट मिठी मारत " बाबा !! बाबा !! मी पास झाली
आई !! मी बाबांचे स्वप्नं पूर्ण केले " म्हणत बाबांकडे पहात राहिली

मी तिला पुष्पं देत असता माझ्याही डोळ्यांत पाणी आले
पण तिच्या डोळ्यांतील अश्रू मात्र थांबत नव्हते
तिने दिलेला पेढा मला मात्र गोड लागत नव्हता
कारण काळाने तिच्या यशाचा आनंद बाबा विना हिरावून नेला होता

अश्या अनेक साक्षी सारखे मुलं मुली आजही पालकाविना अनाथ आहेत
खडतर कष्ट एक जबरदस्त जिद्द त्यांच्या डोळ्यांत आहे
त्यांचे यशाचे मार्ग ते स्वतः शोधतात
कोणी नसता ते स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार ठरतात

साक्षीला निरोप देतांना मन खरच गलबलून गेलं
तिचा रडका चेहरा आणि डोळ्यांत यशाची एक विलक्षण झेप घेण्याचं
स्वप्नं तिच्या अश्रूंच्या पलीकडे लपले असल्याचे मी पाहिलं होतं
कारण तिला बाबांचे स्वप्नं पूर्ण करून खूप मोठं व्हायचं होतं.

खरंच तिला खूप मोठं व्हायचा होतं "" HATS ऑफ साक्षी ""

No comments:

Post a Comment