भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर छत्रपति संभाजी राजांना औरंग्याने अत्यंत क्रुरपणे ठार मारले. राजांच्या देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करुन नदी काठावर व पाण्यात फेकुन देण्यात आले. खरे तर इतर वेळी दुनियाभरातील पापे करणारी पापी मंडळी आपले पाप प्रक्षलन करण्यासाठी अशा पवित्र नद्यांच्या संगमावर येतात. परंतु त्या नद्याच आज संभाजी महाराजांच्या देहाच्या मासाच्या फेकल्या गेलेल्या तुकड्यांनी रक्तांनी पावन झाल्या होत्या. आख्या महाराष्ट्राला पावन करणार्या या नद्यांनाच पावन करण्याची संधी या बलिदानाच्या निमित्ताने संभाजी राजांना जीवनाच्या शेवटाच्या क्षणी मिळाली. तेही महाराष्ट्राचे एक प्रकारे भाग्याच होय.
पुण्याच्या बारा मावळ मधुन झालेली स्वराज्याची सुरुवात संभाजी राजांना पुण्याच्या परिसरात मारुन आपण शेवट करु असा गैरसमज असणार्या बादशहाला पुढे आयुष्यभर कळुन चुकले की आपण जेवढे संभाजी राजांचे हाल हाल केले तेवढा हा महाराष्ट्र देश पेटुन उठला व भीमा इंद्रायणीच्या पात्रात साक्षात सामिल झालेले शंभु राजांचे रक्त घराघरात लोकांना प्रेरणा देवुन गेले. देशासाठी जगायचे तर शिवबा सारखे आणि मरायचे तर संभाजी सारखे हाच तो संदेश आणि हाच तो महाराष्ट्राच्या मुक्तीचा मंत्र. संभाजी राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करुन नदी काठवर फेकल्याचे सर्वात पहिले जर कोणाला कळले असेल तर ते जना परटीणीला. कारण नदीवर कपडे धुण्याकरीता ती गेली होती. बिचारी कपडे तसेच घेवुन धावत धावत पळत आली गावच्या पाटलासह सर्व मंडळींना त्या धनगराने सांगितलेली सर्व हकिकत सांगितली परंतु कोणीही पुरुष बादशहाच्या फर्मानामुळे पुढे येण्यास धजत नव्हता.
अख्खा महाराष्ट्र जणु षंड झाला होता तेंव्हा याच जना परटीणीने आपली मालकीन राधाबाई व इतर महिलांना गोळा करुन संभाजी राजांच्या देहाचे तुकडे गोळा करुन अंतिम संस्कार करण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे अंधार्या रात्रीत धडपडत जावुन त्या सर्व महिलांनी संभाजी राजांच्या देहाचे विखुरलेले तुकडे गोळा करुन गावात आणले कारण नदी किनारी आग पेटवली असली तर औरंग्याच्या सैनिकांना कळले असते. आणि औरंग्याने तर फतवाच काढलेला शंभु राजाच्या देहाला कोणी हात लावायचा नाही.
अहो पण मृत्युच्या भीतीने आपल्या राजाच्या देहाला शिवायला महाराष्ट्रातील वतनदार जरी घाबरले असतील तरी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी बाळकडु पाजुन घडवलेली स्त्री शक्ति मात्र अजुनही शाबुत होती. आणि त्यांच्या मनगटांनीच ते आव्हान पेलले व शंभु राजांच्या देहाला अग्नि देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आणि महाराष्ट्राच्या समस्त रयतेची अग्नि परिक्षा ठरु शकणार्या या अत्यंत अवघड आणि मोलाच्या कामगिरीला त्यांना अंजाम दिला.
ज्या संभाजीच्या चरित्र्यावर बखरकारांनी अनेक प्रकारचे शितोंडे उडविले त्या मुर्खांना जेंव्हा हे कळेल की शंभु राजाच्या चितेला अग्नि देण्यासाठी जेंव्हा अख्खा महाराष्ट्र षंड झाला होता तेंव्हा हीच स्त्री शक्ती या राजाच्या अग्निसंस्कारासाठी कामी आली. एखाद्या दुर्व्यसनी बदफैली व्यक्तिसाठी स्त्री वर्गाची एवढी अपार सहानभुती असुच शकत नाही. शेवटी शंभु राजांच्या चितेला अग्नि देण्याची मातृशक्तिने तयारी दाखवली तरीही महाराष्ट्रातील वतनदार जमीनदार खानदानी लोक चितेसाठी जागा द्यायस तयार नव्हते. तेंव्हा गाव कोसाबाहेर राहणार्या महार समाजाने शंभु राजांच्या चितेला अग्नि देण्यासाठी आपली जागा उपलब्ध करुन दिली.
परंतु सर्वात मोठा वाटा होता तो स्त्री शक्तीचा त्यामुळे जेंव्हा जेंव्हा संभाजी राजांच्या चरित्राचा उच्चार केला जाईल तेंव्हा तेंव्हा या मातृशक्तीचा महाराष्ट्र देशावर आणि स्वराज्यावर असलेले उपकार स्मरण केले जातील हे मात्र नक्की ज्या छत्रपति संभाजींना बखरकारांनी स्त्रीयांचे नाव जोडुन बदनाम केले ते कदाचित नियतीला मंजुर नव्हते आणि सत्य बाहेर येणे काळाची गरज होती म्हणुनच कदाचित संभाजी महाराजांच्या चितेला अग्नि देण्यासाठी स्त्री शक्तीला पुढाकार घेण्याची संधी मिळाली आणि स्त्री शक्तीने हे ऐतिहासिक कार्य पार पाडुन संभाजी राजांच्या चितेला अग्नि देवुन त्यांच्या बद्दल बखरकारांनी तयार केलेले खोटे नाटे प्रसंग यांनाही अग्नि दिला.
No comments:
Post a Comment